Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत.

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत.

 ग्रामपंचायत प्रशासन चालवत असताना गाव कारभाऱ्यांनी गावच्या साधन संपत्तीवर लक्ष ठेवणे त्याची गुणवत्ता त्याचे त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची कर्तव्य व भूमिका असते या संदर्भात ग्रामपंचायत अधिनियमांमध्ये कलम 52 नुसार इमारती उभारण्यावर नियंत्रण या मसुद्याखाली सगळी कार्यप्रणाली दिलेली आढळून येते यामध्ये कोणताही व्यक्ती हा ग्रामपंचायतीच्या पूर्वपरवानगीशिवाय गावच्या सीमेत कोणतीही इमारत उभारणार नाही त्याचबरोबर ग्रामपंचायतलाही अशी इमारत उभी करण्यासाठी जर अर्जदाराकडून परवानगी मागणी अर्ज आल्यानंतर तो ग्रामपंचायतीने दोन महिन्याच्या आत परवानगी द्यावी असं नमूद करण्यात आलेला आहे.

 जर एखादी व्यक्ती ग्रामपंचायत परवानगीशिवाय इमारत उभारेल तर त्याला ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे दंड व शिक्षा होऊ शकते या पद्धतीची तरतूद केली गेलेली आढळते.

 या कलमा अंतर्गत "इमारत उभारणे" किंवा "पुन्हा उभारणे" या शब्दप्रयोगांचा उल्लेख आढळतो त्याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे देता येतं.

1. कोणत्याही इमारतीत कोणताही महत्वाचा बदल करणे व ती प्रवर्धित करणे.

2. जी कोणतीही जागा आरंभी माणसांच्या राहण्यासाठी बांधलेली नसेल त्यात रचनात्मक बदल करून तिचे माणसांनी राहण्यासाठी योग्य अशा जागेत परिवर्तन करणे.

3. इमारतीच्या जल निषरणा विषयक किंवा स्वच्छता विषयक व्यवस्थेत बदल होईल किंवा तिच्या सुरक्षिततेवर महत्त्वाचा परिणाम होईल असा इमारतीत बदल करणे.

4. कोणत्याही इमारतीत कोणत्याही खोल्या इमारती उपहारगृहे किंवा इतर संरचना यांची भर करणे.

5. आरंभी धार्मिक पूजे आर्ची ची जागा किंवा पवित्र इमारत म्हणून नसलेली किंवा बांधण्यात न आलेल्या कोणत्याही जागेत किंवा इमारतीत कोणताही संरचनात्मक बदल करून तिचे अशा प्रयोजनासाठी असलेल्या जागेत किंवा इमारतीत परिवर्तन करणे.

6. एखाद्या खुल्या जागेवर छप्पर किंवा अच्छादन घालून ची रचना तयार होते त्या संबंधात भिंतीवर इमारती यांच्यामधील अशा जागेवर छप्पर किंवा अच्छादन करणे.

7. प्रारंभी गाळा दुकान वखार किंवा गोदाम म्हणून उपयोगा आणणारे परंतु बांधण्यात न आलेल्या कोणत्याही इमारतीचे अशा गाळ्यात दुकानात वखारीत किंवा गोदामात परिवर्तन करणे किंवा प्रारंभी गाळा दुकान वखार किंवा गोदाम म्हणून उपयोग करण्यासाठी बांधलेल्या कोणत्याही इमारतीचा असा गाळा दुकान वखार किंवा गोदाम म्हणून उपयोग न करणे.

8. जर एखाद्या भिंतीच्या मालकाकडे लिहित नसलेल्या कोणत्याही सडकेला किंवा जमिनीला लागून असलेल्या भिंतीत अशा सडकेवर किंवा जमिनीकडे उघडणारा दरवाजा बांधणे.

 वरील सर्व क्रिया या ग्रामपंचायत अधिनियम क्रमांक 52 नुसार इमारत उभारणे किंवा पुन्हा उभारणे याचं विश्लेषण करतात. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने या सगळ्या क्रियांचा स्पष्टीकरण व लोकांना जागृत करण्यासाठी उपाययोजना करून लोकांच्या कायदा सुव्यवस्था यासंदर्भात आपुलकी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे म्हणजेच पारदर्शकता येईल त्यामुळे लोकांना ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल आपुलकी वाटेल ते आपला घरपट्टी पाणीपट्टी आरोग्य कर इत्यादींचा व्यवस्थित भरणा करून आपलं ग्रामपंचायत प्रशासन कसं भक्कम आणि लोकांच्या कल्याणासाठी उभे राहील यासाठी प्रशासनाबरोबर उभे राहतील पण हे केव्हा   ?¿???????


 ज्यावेळी प्रशासन, ग्रामपंचायत, गावकारभारी,ग्रामविकास अधिकारी हे लोकशाहीचा अर्थ....

 "लोकांनी लोकांच्या साठी चालवलेलं लोकराज्य असा काढतील त्यावेळेला ते शक्य होणार"......

Post a Comment

0 Comments