समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजातील एक महान विचारवंत, तत्त्वज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते.त्यांचा जन्म अत्यंत कठीण आणि विषम सामाजिक परिस्थितीत झाला.लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचा त्रास सहन करावा लागला.तरीही त्यांनी शिक्षणाच्या बळावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे उच्च शिक्षण घेतले.ते अत्यंत विद्वान आणि दूरदृष्टी असलेले नेते होते.त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि जातीय भेदभावाविरुद्ध कठोर लढा दिला.“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा प्रसिद्ध संदेश आजही प्रेरणादायी आहे.त्यांनी दलित, शोषित आणि वंचित घटकांसाठी आयुष्यभर काम केले.त्यांच्या कार्यामुळे समाजात समानतेची जाणीव निर्माण झाली.भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान अमूल्य आहे.त्यांनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा यासाठी संविधान तयार केले.
“संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते जीवन जगण्याचा मार्ग आहे” असे त्यांचे मत होते.
ते महिलांच्या हक्कांसाठीही लढले.कामगार आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक सुधारणा केल्या.त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.
“मनुष्य महान जन्माने नाही, तर कर्माने होतो” हा त्यांचा विचार समाजाला दिशा देणारा आहे.
त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून समतेचा संदेश दिला.त्यांच्या या निर्णयाने लाखो लोकांना नवीन जीवनमार्ग मिळाला.
डॉ. आंबेडकरांचे जीवन संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.
त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हार मानली नाही.त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत.
“ज्ञान हेच मनुष्याचे खरे शस्त्र आहे” हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
त्यांनी शिक्षणाला सर्वात मोठे साधन मानले.त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाज अधिक न्याय्य आणि समतावादी बनला.आजच्या काळातही त्यांच्या विचारांची गरज अत्यंत महत्त्वाची आहे.समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांच्या आदर्शांचा अवलंब करणे आवश्यक आहे.त्यांचे कार्य आणि विचार प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत.
135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
प्रा. किशोर शिवाजी गुजर
महिला महाविद्यालय, कराड.


Post a Comment
0 Comments