Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं  आयोजन.

 भिमरत्न तरुण विकास मंडळ सोनवणे ग्रुप  येवती यांच्यावतीने केलं आयोजन.

येवती :- प्रतिनिधी.

 विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक,शैक्षणिक, जनजागृती घडावी यासाठी विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याच उद्देशाने भिमरत्न तरुण विकास मंडळ सोनवणे ग्रुप येवती (ता. कराड) कार्यरत आहे. भिमरत्न तरुण मंडळ सोनवणे ग्रुप येवती या मंडळाचे अध्यक्ष अक्षय सोनवणे, उपाध्यक्ष गणेश सोनवणे, खजिनदार सुरेश सोनवणे व जयसिंग कांबळे यांच्या तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या  निर्णयानुसार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय मुलांच्या भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक जनजागृती साठी प्रमुख वक्ते अरुण आंबवडे यांचं  व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. याबरोबरच पारंपारिक वाद्य लेझीम पथकाच्या समवेत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं आहे. याप्रमाणे भिमरत्न तरुण विकास मंडळ सोनवणे ग्रुप येवती यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमांच 16 एप्रिल 2026 रोजी आयोजन केलं आहे.

Post a Comment

0 Comments