Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे निरोप व शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे निरोप व शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न.


उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या  पुष्पा पाटील या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलांनी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व शिक्षक वृंद उपस्थित होता.  यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजचा दिवस तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. दोन वर्षांपूर्वी तुम्ही फार्मसी या क्षेत्रात एक स्वप्न घेऊन प्रवेश केला होता आणि आज एक तुम्ही फार्मासिस्ट म्हणून समाजात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहात, तुम्ही आरोग्यवस्थेचा एक महत्त्वाचा कणा आहात. डॉक्टर औषध लिहून देतात पण ते औषध रुग्णांना नीट समजावून सांगणारा त्यांच्या शंका दूर करणारा आणि औषधांचे शास्त्र जाणणारा फार्मासिस्ट हाच खरा मार्गदर्शक असतो. तुमच्या एका सल्ल्यावर एखाद्याचे प्राण वाचू शकतात हे नेहमी लक्षात ठेवा असे सांगून पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.  वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फार्मसी हे क्षेत्र केवळ औषध विक्रीपुरते मर्यादित नसून ते समाजसेवेचे एक उत्तम माध्यम आहे. तसेच इथून बाहेर पडताना तुम्ही केवळ पदविका घेऊन जात नसून रुग्णांच्या सेवेची एक फार मोठी जबाबदारी घेऊन जात आहात. तसेच सर्व औषधांची माहिती तुम्हाला असायलाच हवी व संवाद कौशल्य तुमचे चांगले असायला पाहिजे असे सांगून प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक परीक्षेला कसे सामोरे जावे तसेच आता राहिलेल्या मर्यादित वेळेचा अभ्यासासाठी कसा उपयोग करावा हे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी  द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमधील आठवणींना उजाळा दिला व आपली मनोगते व्यक्त केली.  प्रा. मोनिका शिंदे व प्रा. नम्रता रणपिसे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सूत्रसंचालन धनश्री नाईक व पुनम सावंत यांनी केले व आभार मृणाल बेर्डे हिने मानले.संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी,सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments