बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मुंबई प्रदेश यांच्यावतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर याचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक संविधान तज्ञ बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने हे उपस्थित राहणार आहेत.हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11. 00 वाजता मुन्सिपल उर्दू शाळा चेंबूर, पश्चिम चेंबूर रेल्वे स्टेशन जवळ, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असं आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे.


Post a Comment
0 Comments