Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कराड तालुका प्रीमियर लीग २०२६ चा कोपरखैरणेत शानदार प्रारंभ.

 कराड तालुका प्रीमियर लीग २०२६ चा कोपरखैरणेत शानदार प्रारंभ.

कराड दक्षिण रहिवासी संघाची स्थापना

गोंडवाना न्यूज ब्युरो :-

नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथे भूमिपुत्र मैदानावर कराड तालुका प्रीमियर लीग २०२६ (पर्व ५) या क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ झाला. कराड दक्षिण रहिवासी संघ, नवी मुंबई यांच्या पुढाकारातून व कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनातून ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह  पाटील दादा यांची देखील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होते.यावेळी बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की  खेळाडूंना प्रोत्साहन देत नवी मुंबईत राहणाऱ्या कराडकरांनी खेळाच्या माध्यमातून जपलेली एकजूट कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी संघाचे अध्यक्ष दीपक लोखंडे, भाजप नगरसेवक संदीप म्हात्रे, भाजपाचे नगरसेवक डी. आर. पाटील, भाजपच्या नगरसेविका  सायली शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कराड दक्षिण रहिवासी संघ हा या स्पर्धेचा मुख्य आधार ठरला. कराड दक्षिण रहिवासी संघाचे अध्यक्ष दीपक लोखंडे व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.नवी मुंबई, घणसोली व परिसरात राहणाऱ्या कराडकरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हा संघ कार्यरत असून, समाज एकजूट आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments