Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश देणारा दीपस्तंभ म्हणजे गुरु.______मा.नितीन ढापरे

 विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश देणारा दीपस्तंभ म्हणजे गुरु.______मा.नितीन ढापरे

 

कराड - प्रतिनिधी.

  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून मा.नितीन ढापरे उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती कराड होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश देणारा दीपस्तंभ म्हणजे गुरु होय. विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी तो गुरु एवढा मोठा कधीही होत नाही. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या संकुलात जे जे विद्यार्थी घडले त्यांच्या जीवनाचे सोने झाले.  आज मला माझ्या महाविद्यालयाचा खूप अभिमान वाटतो.आज त्यांनी मला प्रमुख उपस्थिती म्हणून सन्मानित केले. गुरुजनांच्या आशीर्वादामुळेच हे सर्व घडले आहे. आज बऱ्याच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात पारितोषिके व पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी यातून प्रगतीची प्रेरणा घ्यावी व आपल्या महाविद्यालयाचा गुरुजनांचा नावलौकिक वाढवावा. ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळालेली नाहीत त्यांनी सुद्धा शांत न राहता प्रयत्न करून पारितोषिक प्राप्त करून घेतली पाहिजेत. निरंतर प्रयत्नानेच यश मिळते.

                  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले,आपण जे बीज पेरत जाऊ ते उगवल्या वाचून राहत नाही. त्यासाठी मशागत करावी लागते. विद्यार्थी जीवनात अशीच तपश्चर्या केली तर त्याचे फळ चांगलेच मिळते. पारितोषिक कार्यक्रम हे निमित्त असते परंतु विद्यार्थ्यांचा त्यांच्या कलागुणांचा सन्मान करण्याचा हा एक सोनेरी प्रसंग असतो. यातूनच प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी यशस्वी होत असतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात सर्वांना मी धन्यवाद देतो!

                   वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. कौस्तुभ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस पात्र विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले.उपस्थित देणगीदारांचाही गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. सुरेश यादव यांनी केला. अहवाल वाचन प्रा. सचिन बोलाईकर यांनी केले. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे व गुरुदेव कार्यकर्त्यांचे पुरस्कार वाचन डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केले. जिमखाना विभागाचे बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे वाचन प्रा. गौरव पाटील यांनी केले. ज्युनिअर विभागाच्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे वाचन प्रा. सुरेश यादव यांनी केले. आभार डॉ. सुभाष कांबळे यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. शैला चोबे व प्रा. शितल सालवाडगी यांनी केले. 

 या कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, माजी प्राचार्य डॉ.जे. ए. म्हेत्रे, कालवडे गावचे सरपंच सुदाम मोटे, लवंडमाची गावचे माजी सरपंच विजय दुर्गावळे व उपसरपंच मा. रामदास सरोदे, प्रा. ए.बी. कणसे, प्रा.व्ही. टी. मगर, प्रा. पी. डी. पाटील, प्रा यु.आर. माने, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रमोदजी सुकरे, प्रा. बी.जी फलके, प्रा. सुरेश रजपूत, महाविद्यालयातील सर्व स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments