Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

प्राथमिक आरोग्य केंद्र येवती येथे एच.पी.व्ही. लसीकरण उत्साहात संपन्न.

 प्राथमिक आरोग्य केंद्र येवती येथे एच. पी.व्ही.लसीकरण उत्साहात संपन्न.

कराड - प्रतिनिधी. 

प्राथमिक आरोग्य केंद्र येवती येथे एच पी व्ही लसीकरण उत्साहात संपन्न झाले, या लसीकरणाचे उद्घाटन येवती गावच्या सरपंच हिराबाई गुरव यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र माळी, डॉ चंद्रकांत सातपुते, डॉ. क्षितिजा सुकरे, आरोग्य निरीक्षक बाबासाहेब सानप, यासह सर्व कर्मचारी आशा उपस्थित होत्या, यावेळी बोलताना सानप म्हणाले की, गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून एच पी व्ही  लस दिली जाते, ही लस 135 देशांमध्ये दिली गेली आहे, भारतामध्ये मात्र आता याची सुरुवात झाली आहे ,हा लस देण्याचा कार्यकाल  90 दिवस साठी असल्यामुळे तीन महिने फक्त चालणार आहे ,आपली त्यामध्ये दहा लसीकरण होणार आहेत, त्या लसीकरणासाठी फक्त 14 वर्षे पूर्ण झालेल्या मुली पंधरा वर्षे पूर्ण होऊन तीन महिने झाले आहेत अशाच मुलींनाही लस आत्ता उपलब्ध आहे, बाकी कुणालाही देता येत नाही अशी माहिती त्यांनी बोलताना यावेळी दिली, सदरची लस प्राथमिक आरोग्य केंद्र येवतीच्या माध्यमातून 11 मुलींना देण्यात आली.



Post a Comment

0 Comments