समाज विकास विद्यालयात जागतिक वनसंरक्षण दिवस साजरा.
शिराळा - प्रतिनिधी.
21 मार्च जागतिक वन संवर्धन दिवस समाज विकास विद्यालयात जागतिक वनसंरक्षण दिवस साजरा करण्यात आला.जागतिक वन संवर्धन दिवस आणि जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शिराळा वनपरिक्षेत्राचे अधिकारी कर्मचारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. पी. पाटील ,उप मुख्याध्यापक श्री. पी. बी. मोहिरे ,पर्यवेक्षक श्री. ए. आर. कुलकर्णी , श्री. एम. एच. जाधव हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या पोस्टर प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना वनविभागाकडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जागतिक वनसंवर्धन दिवसाबद्दल सविस्तर विवेचन वनपाल श्री. मगदूम साहेब यांनी केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी सर्व विद्यार्थ्यांना वनसंवर्धन, वृक्ष संवर्धन याबद्दल आवाहन करून या वनसंवर्धन दिनाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वि.वि. मदने व आभार डॉ. श्री. संदीप गोसावी यांनी मांनले. या कार्यक्रमासाठी शिराळा वनपरिक्षेत्रातील कर्मचारी, विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments