Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

महिला महाविद्यालयाची ‘रत्नागिरी दर्शन’ सहल उत्साहात संपन्न.

 महिला महाविद्यालयाची ‘रत्नागिरी दर्शन’ सहल उत्साहात संपन्न.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

शिक्षण मंडळ,कराड संचालित महिला महाविद्यालय कराड सहल विभाग आयोजित शैक्षणिक वर्ष 2025-2026 मधील सहल दिनांक 17/3/2026 रोजी संपन्न झाली. सदर सहलीचा मार्ग कराड - कोकरूड - आंबा घाट - नाणीजदाम - रत्नागिरी - तिबा पॅलेस - रत्नदुर्ग किल्ला - भगवती मंदिर - शिवसृष्टी -फिश मरीन म्युजियम- आरे-वारे बीच - गणपतीपुळे असा होता. विद्यार्थीनींना पर्यावरण जवळून दाखविणे, ऐतिहासिक स्थलांना भेटी देणे, अध्यात्मिक स्थळाचे महत्व सांगणे, समुद्र -जीवसृष्टी दाखविणे हाच हेतू या सहलीचा होता. महाविद्यालयाचे कार्यकुशल प्राचार्य डॉ.भरत बल्लाळ यांच्या अनमोल मार्गदर्शन मिळाले.याच बरोबर स्टाफ सेक्रेटरी प्रा.विलास सुर्वे यांनीही अनमोल सूचना व सहलीच शुभेच्छा दिल्या. या सहलीमध्ये अनेक विद्यार्थीनी समाविष्ट झाल्या होत्या. यावेळी सहल प्रमुख, प्रा.विनोद सागरे, सहल समिती सदस्य प्रा. सुहासिनी पाटील, प्रा. श्रद्धा खेर, प्रा.सचिन करचे उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments