Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

स्वामी आनंद स्वरूप यांच्या वक्तव्यांविरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे पोलिसांना निवेदन.

स्वामी आनंद स्वरूप यांच्या वक्तव्यांविरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे पोलिसांना निवेदन.

 ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाईची मागणी.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

चेंबूर येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने स्वामी आनंद स्वरूप यांच्या आक्षेपार्ह व समाजविघातक वक्तव्यांविरोधात टिळक नगर पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीची व आक्षेपार्ह विधाने करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.नुकत्याच नाशिक येथील भोंदू बाबा “अशोक खरात” प्रकरणाच्या संदर्भात बोलताना स्वामी आनंद स्वरूप यांनी अनुसूचित जातीतील आंबेडकर महार समाज तसेच आंबेडकरी विचारधारेविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात या प्रकरणाचा संबंधित समाजाशी कोणताही संबंध नसताना, जाणूनबुजून तो संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असून सामाजिक सलोखा बिघडू शकतो. त्यामुळे स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 (ॲट्रोसिटी ॲक्ट) तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी दिपक चौगुले, धनंजय तूपलोंढे, अमर भंडारे, प्रशांत आढाव, प्रवीण पवार, प्रकाश कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments