वडगाव हवेली गावात धार्मिक एकतेचा संदेश.
कार्वे - प्रतिनिधी.
वडगाव हवेली ता.कराड येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा संपन्न झाला. या पारायण सोहळ्याचा सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न होत आहे. 27 मार्च ते 3 एप्रिल या दरम्यान हा ज्ञानेश्वरी सोहळा संपन्न होत आहे. यावेळी श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंडळ व समस्त ग्रामस्थ वडगाव हवेली यांच्या हस्ते धार्मिक व सामाजिक सलोखा राखण्याचं अनोख काम करण्यात श्री. मुबारक शेख व सौ. शबाना शेख यांचा या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात गौरव करण्यात आला. हा गौरव म्हणजे धर्मापलीकडच्या नात्यांचा सन्मान आहे. इथे नाव, जात, धर्म विचारले जात नाहीत.इथे फक्त माणूसपण ओळखलं जातं.हिंदू-मुस्लिम ऐक्य हीच आमच्या गावची खरी ओळख आहे.अठरा पगड जाती-धर्म एकत्र येऊन जेव्हा “आपण” म्हणून जगतात, तेव्हाच वडगाव हवेली सारखं गाव घडतं आणि अभिमानाने डोकं उंचावतं. इथेच पाहायला मिळतो विविधतेतील एकता असलेला भारत देश .


Post a Comment
0 Comments