समाज विकास विद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न.
शिराळा :- प्रतिनिधी.
समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नामांकित, विचारवंत ,ज्येष्ठ साहित्यिक आणि हाय्यर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. वैजनाथ महाजन त्याचबरोबर हाय्यर एज्युकेशन सोसायटीचे जेष्ठ संचालक श्री. प्रदीप हसबनीस यांच्या उपस्थितीमध्ये इ. पाचवी ते बारावी या वर्गाची पालक सभा अगदी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. आर पी .पाटील यांनी केले.न्यू इंग्लिश स्कूल शिराळाचे माजी मुख्याध्यापक व शाळा समिती सदस्य मा. श्री. एस. एस.भोसले , समाज विकास विद्यालय सागाव चे माजी मुख्याध्यापक व शाळा समिती सदस्य श्री. ए. बी. चव्हाण, वारणा प्रसाद विद्यालय, बिळाशी चे माजी मुख्याध्यापक श्री. बी. एम .पाटील यांनी शालेय कामकाजाच्या नेमून दिलेल्या विषयानुसार पालकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मा.श्री प्रदीप हसबनीस आणि मा. मुख्याध्यापक यांनी पालकांच्या शंकाचे समाधान करत हितगुज केले. पालक सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असलेले सागाव गावचे ज्येष्ठ नागरिक श्री .बळवंत दाजी पाटील यांनी पालक मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मा. श्री. वैजनाथ महाजन यांनी "पालकत्व आणि आई-वडील" यांच्यातील फरक आणि जबाबदाऱ्यांची उदाहरणांसहित स्पष्टीकरण देऊन जाणीव करून दिली.कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कामकाज सांभाळत दोन्ही विभागाचे पर्यवेक्षक मा. श्री ए. आर.कुलकर्णी आणि मा. श्री एम. एच जाधव उपस्थित होते.पालक सभा कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मा. श्री.पी. बी. मोहिरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. व्ही. विभूते यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. विकास पाटील , श्री.एस. आर. वर्णे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. पालकांचे शंका समाधान, त्याचबरोबर शालेय प्रगती विषयीचा लेखाजोखा आणि भविष्यातील विद्यार्थ्यांची प्रगती त्यासाठी शिक्षकांचे सुरू असलेले प्रयत्न पुढील वर्षाचे नियोजन आणि सोयी सुविधा यांचे बद्दल चर्चा होऊन पालक सभा संपन्न झाली.


Post a Comment
0 Comments