महिला महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न.
कराड :- प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ कराड संचालित महिला महाविद्यालय कराड येथे शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ आणि त्यांनी शोधलेल्या "रामन इफेक्ट"च्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महिला महाविद्यालय विज्ञान विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी साधन व्यक्ती म्हणून डॉ. मेधा कुमठेकर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. बल्लाळ हे होते. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग सोनटक्के यांची होती. विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान विभागाने पोस्टर, मॉडेल, फोटोग्राफ्स सादरीकरण स्पर्धा तसेच विज्ञान विषयक निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवरांनी उपस्थितांना विज्ञान व मानवी विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना वायदंडे यांनी केलं. यावेळी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी अक्सा पटेल व आश्लेषा ललगे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. वैभव रांजणे यांनी केलं.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



Post a Comment
0 Comments