Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्सहात साजरा.

 श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्सहात साजरा.

कराड - प्रतिनिधी.

 श्री. कोटेश्वर विद्यालय, गोवे येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उपकरणे तयार करण्यात आलेली होती.यावर्षी विद्यालयात पदार्थ विक्रीतून विज्ञान हा नवीन उपक्रम सादर करण्यात आला या उपक्रमामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता .

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नवोदय विद्यालय येथील श्री. रोहित अहलुवालिया यांनी विद्यार्थ्यांना डॉ. सी. व्ही. रमण यांच्या कार्याची माहिती सांगून विविध प्रयोग विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक रित्या समजून सांगितले .विद्यार्थ्यांना विज्ञान विषयी योग्य मार्गदर्शन श्री. रोहित  यांनी केले .विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. लक्ष्मण उबाळे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या विभा साबळे यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे आभार मीना जाधव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विज्ञान विभागातील सदस्य साळुंखे, श्री.टंकसाळे व आनंदराव जाधव यांनी अथक परिश्रम घेतले .या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.नंदाभाऊ जाधव,सचिव तुकाराम जाधव,तज्ञ संचालक श्री. भुजंगराव जाधव यांनी शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments