Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

वारणा विद्यालयात 'राष्ट्रीय विज्ञान दिन' उत्साहात साजरा.

 वारणा विद्यालयात 'राष्ट्रीय विज्ञान दिन' उत्साहात साजरा. 

शिराळा -प्रतिनिधी. (नानासाहेब कांबळे.)

 भारतीय शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ आणि त्यांनी शोधलेल्या 'रामन इफेक्ट'च्या स्मरणार्थ, वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे 'राष्ट्रीय विज्ञान दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञानाप्रती विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ.यु. आर. पाटील यांनी केले. कार्यक्रमांचे अध्यक्ष  मुख्याध्यापक ए.सी. सदावर्ते हे होते.त्यांनी सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार केला. यावेळी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय इ.५ वी ते इ.८वी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सौर ऊर्जा, जलसंधारण, टाकाऊतून टिकाऊ वस्तू आणि आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले.शाळेतील  विज्ञान शिक्षिका सौ यु आर पाटील मॅडम विद्यार्थ्यांना संबोधित केले.विद्यालयातील इ. ७ वी घ्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता महत्व याविषयी नाटिका सादर केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एस सी सदावर्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस. एच इंगवले  यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. व्ही. डी. पाटील यांनी केले.




Post a Comment

0 Comments