Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म. घोगाव महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म. घोगाव  महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


उंडाळे -प्रतिनिधी.

आयुष्याच्या मार्गावर शिक्षण खूप महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी समाजाच्या विकासासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा असे मत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी व्यक्त केले.

घोगाव ता. कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी. फार्म व ज्युनिअर कॉलेज घोगाव यांच्या संयुक्त शैक्षणिक दालनाचे वार्षिक स्नेहसंमेलन कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे नुकतेच उत्साहात झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी होते. डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील, श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रामलिंग पत्रकार, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मनीषा हरळीकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

प्रवीण काकडे यांनी विद्यार्थ्यांनी नेहमी पॉझिटिव्ह राहावे, चांगले आचरण आत्मसात करून घराचे व आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसून जोहरी यांनी यश मिळवण्यासाठी मेहनत आणि सातत्य आवश्यक आहे. विद्यार्थी दशकेत शिस्त आणि योग्य दिशेने प्रयत्न केले तर भविष्यात मोठे यश प्राप्त करता येते. शिक्षणासोबत नैतिकता आणि मूल्यशिक्षण महत्त्वाचे असून आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी श्री संतकृपा शिक्षण संस्थेत दीर्घकाळ सेवा करणाऱ्या कर्मचारी आणि प्राध्यापकांचा विशेष गिफ्ट व प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सन्मान केला.

यावेळी क्रीडा क्षेत्रात तसेच विविध शैक्षणिक उपक्रमात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी वार्षिक अहवाल सादर केला यामध्ये वर्षभरात विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले. व वर्षभरातील शैक्षणिक उपक्रम व महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा व शैक्षणिक गुणवत्तेचा त्यांनी विस्तृत आढावा सादर केला व व्यासपीठावरील मान्यवरांचे विशेष सत्कार केले. यावेळी सूत्रसंचालन प्रा. अरुणा परीट व प्रा. सुनीता  सुतार यांनी केले.

वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अरुणा परीट व त्यांच्या सर्व टीमने विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments