छत्रपती श्री.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान संपन्न.
छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना अंतर्गत मांगले ता.शिराळा येथे आयोजित शिबिराला आमदार सत्यजित देशमुख उपस्थित होते . महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ नागरिकांना सुलभ पद्धतीने एकाच छताखाली मिळावा व या निमित्ताने महसूल यंत्रणा प्रत्येक गावापर्यंत पोहचावी, या उद्देशाने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितां सोबत संवाद साधला. तसेच महिला बचत गटांना ‘उमेद’ अभियाना अंतर्गत धनादेशाचे वाटप केले, कृषी विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना टॅक्टर, रोटावेटर साहित्याचे वाटप व संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित केले. यावेळी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन रघुनाथ पोटे, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक, तहसीलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी पंचायत समिती स्नेहल नरवाडे, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, सरपंच प्रल्हाद पाटील अन्य मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.






Post a Comment
0 Comments