महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न.
कराड - प्रतिनिधी.
अमरापूर येथे महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक १० मार्च रोजी अभिजीत कदम प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, अमरापूर , चिखली गावच्या पोलीस पाटील माननीय ॲड. उषा मिशाळ-वायदंडे यांचे कायदेविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य अधिकराव भाट यांनी मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अॅड. उषा मिशाळ-वायदंडे यांनी विद्यार्थ्यांना पॉक्सो कायदा, महिलांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण, सायबर गुन्हे, ट्रॅफिक नियम, डिजिटल सिग्नेचर, शिक्षणाचा अधिकार कायदा २००५ तसेच मुलींसाठीच्या विविध शासकीय योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांचे परिणाम, जुवेनाइल जस्टिस प्रणाली, तसेच गुन्हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय संविधानातील कलम १४, १५ आणि २१ यांचीही माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमादरम्यान ॲड. उषा मिशाळ-वायदंडे यांनी उपस्थित सहाय्यक शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिर्के मॅडम यांनी केले, तर सौ. आरती अंबावडे (सहाय्यक शिक्षिका) यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments