Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

महिला महाविद्यालय, कराड येथे मराठी भाषा गौरव दिन व कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न.

 महिला महाविद्यालय, कराड येथे मराठी भाषा गौरव दिन व कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न.

कराड -प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या किमान समान कार्यक्रमांतर्गत उपक्रम तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा, तालुका विधी सेवा समिती, कराड व वकील संघ, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कराड शिक्षण मंडळ संचालित महिला महाविद्यालय कराड येथे “मराठी भाषा गौरव दिन व कायदेविषयक शिबिर” उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.प्रास्ताविक श्री. दिपक थोरात, अध्यक्ष, कराड वकील बार यांनी केले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.मा. श्री. ए.ए. उत्पाद साहेब, दिवाणी न्यायाधीश, कराड,ॲड.श्री. दिपक थोरात, अध्यक्ष, कराड वकील बार,ॲड.श्री. भारत मोहिते, पॅनेल विधिज्ञ, कराड वकील बार,मा. ॲड. विक्रम कुलकर्णी, कोषाध्यक्ष सदस्य, शिक्षण मंडळ, कराड श्री. हरीश काळे, पॅनेल विधिज्ञ, कराड वकील बार,श्री. आर. डी. भोपते, वरिष्ठ लिपिक व इतर मान्यवर.

जिल्हा व सत्र न्यायालय, कराड प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनात प्रथम श्री. भारत मोहिते यांनी “भाषा जगली तर देश जगतो” या वाक्याने सुरुवात केली. व आपल्या ओघवतीशैलीमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.

यानंतर श्री. हरीश काळे यांनी पॉक्सो कायदा २०१२ अंतर्गत सविस्तर मार्गदर्शन केले. १८ वर्षांखालील मुलांवरील अन्याय हा गंभीर गुन्हा असून जामीन मिळत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कलम १९ नुसार तक्रार देणे बंधनकारक आहे, कलम १७ नुसार गुन्हेगारास आश्रय दिल्यास कारवाई होते, कलम २३ अंतर्गत कायद्याचा गैरवापर केल्यास शिक्षा होते, असे त्यांनी सांगितले. गोपनीयतेची हमी दिली जाते, अन्याय झाल्यास आवाज उठवा आणि ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले. १३ ते २३ वयोगटात स्थिर राहणे, करिअरकडे लक्ष देणे, मोबाईल वापरात सजगता ठेवणे यावर त्यांनी विशेष भर दिला.


ध्यक्षीय मार्गदर्शन करताना मा. श्री. ए.ए. उत्पाद साहेब यांनी “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा” या मंत्राने सुरुवात केली. संविधान हा पवित्र ग्रंथ असून त्यावर आधारित सर्व कायद्यांची अंमलबजावणी होते, असे त्यांनी सांगितले. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार मुलीचे किमान विवाह वय १८ वर्षे व मुलाचे २१ वर्षे असल्याचे स्पष्ट करून उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास व एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे सांगितले. कायद्याचा वापर ढाल म्हणून करावा, तलवार म्हणून नव्हे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.रॅगिंग, लैंगिक छळ, तक्रार प्रक्रिया, सीसीटीव्ही पुरावे, गोपनीयता, पोलीस व न्यायव्यवस्थेची भूमिका याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. “माणसाने माणसाशी माणसासम वागावे” हा संदेश देत संविधानिक कर्तव्यांची जाणीव विद्यार्थिनींमध्ये निर्माण केली.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. भरत बल्लाळ तसेच उपप्राचार्य मा. डॉ. पराग सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख श्री. विलास सुर्वे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्य मा. डॉ. भरत बल्लाळ यांनी केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             


Post a Comment

0 Comments