अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शेवाळे.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी येवती ता. कराड गावचे सुपुत्र दैनिक ललकार चे कराड विशेष प्रतिनिधी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचे नियुक्ती करण्यात आली, सदरची नियुक्ती संस्थापक केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय संघटक व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांनी यापूर्वी पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी देखील आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडून संघटनेची मोट सातारा जिल्ह्यामध्ये बांधली आहे , याचीच दखल घेऊन त्यांना पत्रकार संघामध्ये पदोन्नती देऊन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव केला, याबद्दल पत्रकार शेवाळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, या निवडी बद्दल, माजी राज्यपाल श्रीनिवासजी पाटील,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.डॉ अतुल बाबा भोसले, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, साताऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे,कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, आदींनी अभिनंदन केले


Post a Comment
0 Comments