अन्याविरोधात उभे राहून संघर्ष आणि क्रांती घडवण्याचे सामर्थ्य रूपनारायण सोनकरांच्या लेखनात____ प्रो. (डॉ.) गोरख बनसोडे
कराड - प्रतिनिधी.
25 फेब्रुवारी, 2026 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे हिंदी विभागाच्या वतीने रूपनारायण सोनकर लिखित आत्मकथा: नागफणी एक चर्चा. या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख व्याख्याते प्रो. (डॉ.) गोरख बनसोडे हिंदी विभाग प्रमुख, सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय रहिमतपूर, जिल्हा सातारा हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, वर्तमान काळात जीवन जगत असताना, जातीभेद, उच्चनीचता, अस्पृश्यता,भ्रष्टाचार, लाचखोरी या सर्व समस्यांच्या विरोधात उभे राहून संघर्ष आणि क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य रूप नारायण सोनकर यांच्या लेखनात आढळते. नागफणी आत्मकथा साहित्यातील एक अनमोल ठेवा असून विद्यापीठ परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी या आत्मकथेचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. समाजातील वाईट रूढी परंपरा दूर करण्यासाठी अशा साहित्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला तर निश्चितच भविष्यात सुजान नागरिक होण्यास मदत होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. सचिन बोलाईकर होते आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, हिंदी विभागाने या विषयावरती आयोजित केलेले व्याख्यान विद्यार्थ्यांच्या साठी अत्यंत उपयुक्त आहे रूपनारायण सोनकर हे हिंदी विषयातील अभ्यासू लेखक आहेत त्यांच्या साहित्याचा अभ्यास करावा.
हिंदी विभागाच्या या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार यांनी केले. आभार डॉ. शितल गायकवाड यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सविता येवले यांनी केले. या कार्यक्रमासाठी भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments