Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

महिला महाविद्यालयात " ताण तणाव व्यवस्थापन" या विषयावर कार्यशाळा संपन्न.

 महिला महाविद्यालयात "  ताण तणाव व्यवस्थापन " या विषयावर कार्यशाळा संपन्न.

 कराड - प्रतिनिधी.

 शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड, कॉमर्स विभाग व बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण अग्रणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ताण तणाव व्यवस्थापन  या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. उदय लोखंडे असोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, आर्टस अँड कॉमर्स कॉलेज सातारा हे होते. त्यांनी ताण तणाव याबाबत अगदी साध्या सोप्या भाषेत व काही छोटया खेळांच्या प्रत्यक्षिकासह उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. पराग सोनटक्के हे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी ताण तणाव व्यवस्थापनाची आवश्यकता थोडक्यात सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभागप्रमुख प्रा. के. एस. गुजर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती डी. एस. शिंदे यांनी तर आभार श्रीमती आर. बी. पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी  महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थिनी उपस्थित  होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. बी. बी. बल्लाळ यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. विनोद सागरे, श्रीमती. एस. जी. पट्टेबहाद्दूर व सर्व प्राध्यापक प्राध्यापिका तसेच  शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments