मराठी माझी माय
मी मराठीची, मराठी माझी माय.
माझ्या शब्दांत जपते मी, मराठीची साय.
अभिमानाने वाटे मला, मराठीची आस,
जेव्हा बोलते मी, मराठीत खास.
साधी, सरळ, बोली माझी,
वळवेल तशी वळते गं.
एका साध्या शब्दातूनच,
खूप काही सांगते गं.
म्हणे मजला एके दिवशी,
"अगं, भाषा ही नाही फक्त बोलण्याचं माध्यम."
मीही हसून म्हणाले मग,
"खरचं आहे बघ, हे तर खरं जगण्याचं साधन."
तीच माझी ओळख,
माझं अस्तित्वही तीच,
आणि तीच आहे बघ,
माझ्या अस्मितेचं बीज.
म्हणूनच म्हणते,
मी मराठीची, मराठी माझी माय.
मराठी आहे अभिमानाची खाण,
आम्ही लेकरं राखू,
तिची आण - बान - शान.



Post a Comment
0 Comments