भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संघटनेचा आंदोलनाचा इशारा.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अध्यक्षपदीची निवड रद्द करणेबाबत.
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट .
पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास शाखा सातारा जिल्हा यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. दिनांक 24/02 /2026 या तारखेपासून परिवहन आयुक्त यांच्या दालना बाहेर कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये आंदोलन करणार असल्याचे पत्राद्वारे कळवलेलं आहे.
निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार श्री.विवेक भीमनवार परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांची राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष पदी झालेली निवड रद्द करणे बाबत श्री. भिमनवार यांनी आपल्या सुरू असलेल्या लोकसेवकाच्या कार्यकाळामध्ये लोकसेवकास साजेस असं काम न करता परिवहन कार्यालयातील तांत्रिक व अतांत्रिक कामाची योग्य पद्धतीने विभागणी न केल्यामुळे विभागास मोठ्या नुकसानी सामोरे जावं लागत आहे. आयुक्तांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक कामाची विभागणी केली नाही तसेच याबाबत शासनाला कोणताही प्रस्ताव पाठवला नाही. सदरील विभागातील कामाचे विभागणी न करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना करोडो रुपये दिले आहेत, याबाबत लोकांमध्ये चर्चा आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींची प्रमाणपत्रे व जात पडताळणी प्रमाणपत्रे यांची शासकीय निर्णयानुसार पूर्ततेची प्रक्रिया विभागात पूर्ण केलेली नाही.
परिवहन आयुक्त यांनी श्री. केसकर या अधिकाऱ्याला लाच घेताना सात महिन्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडूनही यालाच श्री. केसकर या अधिकाऱ्याला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती साठी मा. चेतन निकम उपसचिव परिवहन महाराष्ट्र शासन यांचेकडे प्रस्ताव पाठवून पदोन्नती मिळवून दिलेली आहे.
त्यामुळे श्री. विवेक भिमनवार यांनी केलेला भ्रष्टाचार व कामांमध्ये केलेली अनियमितता यामुळे श्री. विवेक भिमनवार यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व कामांमध्ये अननियमित्ता होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची निवड करू नये व भविष्यात होणाऱ्या आचरण भ्रष्ट कृतीला आपण वेळीच आवर घालावा असे या निवेदनाद्वारे मांडण्यात आलं. हे निवेदन सादर करताना श्री. प्रीतम आबा हातेकर कराड तालुका अध्यक्ष, राजेंद्र जयसिंग लादे सामाजिक कार्यकर्ते, जालिंदर प्रताप वाघमारे सामाजिक कार्यकर्ते, निलेश दुधाप्पा गाडे सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments