महिला महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा व फूड फेस्टिवल संपन्न.
कराड -प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ कराडच्या महिला महाविद्यालय कराड येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ व फूड फेस्टिवल संपन्न झाला. महाविद्यालयात महाविद्यालयांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होत. यामध्ये क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनींना बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी डॉ. सौ. सुचिता हुद्देदार, या होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी.बल्लाळ हे होते,त्याचबरोबर कार्यक्रमाससाठी विशेष उपस्थिती डॉ. पराग सोनटक्के उपप्राचार्य महिला महाविद्यालय कराड यांची होती. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयांतर्गत क्रीडा स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थिनींना बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयात फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलं होतं.ग्रहशास्त्र विभाग यांच्या वतीने या फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होत. प्राध्यापिका श्रीमती सुजाता महाडिक यांनी या फूड फेस्टिवलचं आयोजन केल. या फूड फेस्टिवलचे उद्घाटक मा. डॉ.सौ. सुचिता हुद्देदार या होत्या. या फूड फेस्टिवल मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध खाद्यपदार्थ बनवून विक्रीसाठी महाविद्यालय प्रांगणामध्ये स्टॉलची उभारणी केली होती. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्रा. विलास सुर्वे, प्राध्यापक प्राध्यापिका उपस्थित होते. त्याचबरोबर विद्यार्थीनी, पालक,शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार श्री. विलास सुर्वे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती स्वप्ना केतकर व प्रा. किशोर गुजर यांनी केले.




Post a Comment
0 Comments