सेवा संकल्प अंतर्गत भूसंपादन प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सातारा (जि.मा.का.) दि ११ : जलसेवा संकल्प अभियानांतर्गत मौजे कोपर्डे, ता. खंडाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी खाजगी वाटाघाटीद्वारे थेट जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. भूसंपादन, पुनर्वसन आणि वनजमिनींशी संबंधित विविध प्रश्न, त्यावरील कायदेशीर तरतुदी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभागामार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.प्रकल्पांच्या उभारणीदरम्यान निर्माण होणाऱ्या अडचणी, कामांची सद्यस्थिती आणि आगामी काळात नियोजित असलेली कामे याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांना प्रक्रियेची स्पष्ट माहिती मिळावी आणि त्यांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाची प्रक्रिया, जमिनीच्या संपादनासाठी आवश्यक असलेली कार्यवाही आणि पुनर्वसनासंबंधीच्या बाबी समजावून सांगण्यात आल्या. संबंधित प्रश्नांवर नियमांनुसार कार्यवाही करण्यासाठी विभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचीही माहिती देण्यात आली.


Post a Comment
0 Comments