Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

शिरवडे ता. कराड येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे ११ वे पुष्प उत्साहात संपन्न.

 शिरवडे येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे ११ वे पुष्प  उत्साहात संपन्न.

‘दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ (भारतीय बौद्ध महासभा) शाखा तालुका कराड अंतर्गत वर्षावास प्रवचन मालिकेचं आयोजन.



कराड - प्रतिनिधी.

कराड तालुक्यातील शिरवडे येथे ‘दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ (भारतीय बौद्ध महासभा) शाखा तालुका कराड अंतर्गत वर्षावास प्रवचन मालिकेचे ११ वे पुष्प अत्यंत उत्साहात व धम्ममय वातावरणात गुंफण्यात आले.

रविवार, दिनांक ०४ ऑक्टोबर २०२६ रोजी मु.पो. शिरवडे (ता. कराड) येथील बुद्ध विहारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मार्गदर्शक माजी श्रामणेर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक आदरणीय साहेबराव आनंदा लोखंडे सर व भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पश्चिम) विभागाचे संघटक बौद्धाचार्य आदरणीय मधुकर सागरे साहेब यांच्या हस्ते पूजनीय आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थित सर्व उपासक-उपासिकांनी सामुदायिक त्रिसरण-पंचशील, बुद्ध पूजा, भीम स्मरण व भीम स्तुती ग्रहण केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक उपासक अनिल कांबळे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व मार्गदर्शकांचे मौखिक स्वागत केले. यानंतर केंद्रीय शिक्षक साहेबराव लोखंडे सर यांनी 'दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया' (भारतीय बौद्ध महासभा) या संस्थेची स्थापना, इतिहास आणि कार्यप्रणाली याविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बौद्धाचार्य मधुकर सागरे साहेब यांनी ‘बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये’ या विषयावर अत्यंत मुद्देसूद, अभ्यासपूर्ण व सखोल मार्गदर्शन केले. या मुख्य विषयासोबतच त्यांनी बौद्ध पूजापाठ, संस्कार विधी आणि बौद्ध पर्यटनाचे महत्त्व यावरही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी नवनियुक्त भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा शिरवडे येथील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे उपस्थितांच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास गावातील उपासक-उपासिका, बालक-बालिका आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी नवनियुक्त ग्रामशाखा शिरवडेचे कोषाध्यक्ष आयु. सिद्धार्थ कांबळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, मार्गदर्शक व धम्मबांधवांचे मनःपूर्वक आभार मानले. शेवटी 'सरणत्तय' घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






Post a Comment

0 Comments