Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

समाज विकास विद्यालय सागाव येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात.

 

समाज विकास विद्यालय सागाव येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात.


शिराळा - प्रतिनिधी.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग, सांगली सामाजिक वनीकरण परिक्षेत्र शिराळा यांच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान आयोजित जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने समाज विकास विद्यालय, सागाव येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मार्गदर्शक श्री. सोमनाथ पाटील यांनी पशुपक्ष्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष 'जंगल सफारी'ची अनुभूती दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. व्ही. व्ही. मदने यांनी प्रास्ताविक करताना वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व, जैवविविधतेचे संवर्धन आणि मानव-वन्यजीव संतुलनावर मार्गदर्शन केले. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. पी. बी. मोहिरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने निसर्गाप्रति संवेदनशील राहणे गरजेचे आहे."

       आवाजाच्या नक्कलने रंगली 'जंगल सफारी'

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘जंगल सफारीची दुनिया’ या सादरीकरणात श्री. सोमनाथ पाटील यांनी विविध प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून दाखवले. पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांच्या हालचाली व त्यांच्या सवयी यांची रंजक माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांनाही या सादरीकरणात सहभागी करून घेतले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी कुतूहल आणि निसर्गप्रेमाची जाणीव निर्माण झाली.याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री. पी. बी. मोहिरे, पर्यवेक्षक श्री. डी. ए. गायकवाड, वनपाल श्री. अतुल मगदूम, श्री. पांडुरंग खूपसे, श्री. जयसिंग महाडिक आणि वनरक्षक सौ. श्रीदेवी पाटील, सौ. श्वेता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमातून ‘वन्यजीव वाचवा, जंगल वाचवा आणि पर्यावरणाचे संतुलन राखा’ असा मोलाचा संदेश देण्यात आला. सूत्रसंचालन श्री. एस. डी. सुकते यांनी केले, तर फलक लेखन श्री. बी. टी. जाधव यांनी केले. उपस्थितांचे आभार सौ. सी. आर. पाटील यांनी मानले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरला.

Post a Comment

0 Comments