कासेगाव एस.टी. डेपोत प्रवाशांसाठी शौचालय व स्नानगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
कासेगाव - प्रतिनिधी.
कासेगाव येथील एस.टी. डेपोत दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होत असून, प्रवाशांसाठी आवश्यक असलेली स्वच्छतागृह व स्नानगृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या वतीने कासेगाव एस.टी. डेपो व्यवस्थापकांना निवेदन देऊन प्रवाशांसाठी स्वतंत्र व स्वच्छ शौचालय तसेच स्नानगृहाची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.एस.टी. डेपो हे सार्वजनिक ठिकाण असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच दिव्यांग प्रवाशांना स्वच्छतागृहाअभावी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन डेपो परिसरात आवश्यकतेनुसार शौचालय व स्नानगृह उभारण्यात यावे. तसेच या सुविधांची नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा व देखभाल व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.यावेळी कृष्णा आडके, अतुल माने, सचिन निवळे, सोनू पाटील यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments