Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कर्तुत्व आणि मित्रत्व यांचा सुरेख प्रीतीसंगम असलेले व्यक्तिमत्व श्री. शशिकांत पाटील____ प्राचार्य विनोद बाबर

 कर्तुत्व आणि मित्रत्व यांचा सुरेख प्रीतीसंगम असलेले व्यक्तिमत्व श्री. शशिकांत पाटील____ प्राचार्य विनोद बाबर


कराड - प्रतिनिधी.

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. शशिकांत पाटील यांचा सेवा गौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य विनोद बाबर विश्वस्त कृष्णा फाउंडेशन कराड हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, कर्तुत्व आणि मित्रत्व यांचा सुरेख प्रीतीसंगम असलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री शशिकांत पाटील होय. आपल्या सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सर सेवानिवृत्त होत आहेत. संस्थेत सेवेस प्रारंभ केल्यापासून त्यांनी एकनिष्ठपणे सेवा केली. सर्वांशी त्यांनी मित्रत्व जपले. महाविद्यालयात निर्माण होणाऱ्या अनेक कठीण प्रसंगात त्यांनी आपले योगदान दिले आहे. दैनिक प्रीतीसंगम सारखे दैनिक त्यांनी नावारुपास आणले. आपल्या परखड लेखणीतून अनेक समस्या त्यांनी मांडल्या. यामुळेच संस्थेच्या अनेक शाखा असून देखील एका शाखेत त्यांची प्रदीर्घ सेवा पूर्ण झाली. अशी सेवा क्वचितच वाट्याला येते. त्यांच्या भावी वाटचालीसाठी व आरोग्यदायी जीवनासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो!

                  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, मितभाषी असलेले हे व्यक्तिमत्व आपल्या कृतीतून व कर्तव्यातून उभे राहिले आहे. शशिकांत पाटील यांना त्यांचे वडील राष्ट्रीय हॉलीबॉल खेळाडू श्री. आकाराम पाटील यांचा आदर्श वारसा मिळाला आहे. आपल्या कर्तुत्वातून त्यांनी तो जपला आहे. सरांच्या यशामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता पाटील यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यांची श्रेयस व ऋतुजा दोन्ही मुले उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी महाविद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो!

                      कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मा. प्रमोद सुकरे होते. आपल्या मनोगता ते म्हणाले, शशिकांत पाटील खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या शिक्षण पंढरीतील वारकरी होते. ईमाने इतबारे त्यांनी आपली प्रदीर्घ सेवा पूर्ण केली. कार्यक्रमात अनेक मान्यवरांची मनोगते झाली.त्यामध्ये प्रा. ए. जी.थोरात, डॉ. मारुती सूर्यवंशी, डॉ. विनायक जाधव, श्री. प्रमोद तोडकर, श्री. एस. एम. पाटील, श्री राजू दोडमणी, श्री. सचिन पाटील, श्री. बालिश थोरात, श्री. सचिन पाटील, श्री. जगदीश पाटील, श्री. संभाजी पाटील, श्री. पवन पाटील, प्रा. विलास पाटील या सर्वांनी शशिकांत पाटील सरांचे विषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने माननीय प्राचार्यांच्या हस्ते शशिकांत पाटील व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.सुजाता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना शशिकांत पाटील सर म्हणाले, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या सुसंस्कार केंद्रात सेवा करण्याची भाग्य मला मिळाले. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने मला प्रदीर्घ सेवा करण्याची संधी मिळाली. याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ सेक्रेटरी डॉ. सुभाष कांबळे यांनी केले. आभार प्रा. अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. शितल सालवाडगी यांनी केले. या कार्यक्रमासाठी कराड शहरातील व परिसरातील बहुसंख्य पत्रकार प्रतिष्ठित नागरिक महाविद्यालयाचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments