Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कराड येथे 'बौद्धांची आचारसंहिता' विषयावर वर्षावास प्रवचन मालिकेचे १० वे पुष्प संपन्न; उपासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 कराड येथे 'बौद्धांची आचारसंहिता' विषयावर वर्षावास प्रवचन मालिकेचे १० वे पुष्प संपन्न; उपासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

कराड - प्रतिनिधी.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका कराड यांच्या अंतर्गत रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी मु.पो. किवळ (ता. कराड) येथील बुद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिकेचे १० वे पुष्प अत्यंत उत्साहात गुंफण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रवचनकार श्रामनेर व बौद्धाचार्य आदरणीय नंदकुमार भोळे, साहेबराव लोखंडे व मधुकर सागरे यांच्या हस्ते महाकारुणिक बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व उपासक-उपासिकांनी एकत्रितपणे त्रिसरण व पंचशील ग्रहण केले. स्थानिक उपासक सचिन कांबळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली व सर्व प्रवचनकारांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले.

केंद्रीय शिक्षक साहेबराव लोखंडे सर यांनी मनोगत व्यक्त करताना भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची ध्येयधोरणे, पार्श्वभूमी आणि कार्याची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर त्यांनी कराड तालुका संस्कार सचिव आदरणीय नंदकुमार भोळे सर हे मुख्य विषयावर मार्गदर्शन करतील असे सूचित केले.मुख्य विषय "बौद्धांची आचारसंहिता" यावर मार्गदर्शन करताना नंदकुमार भोळे सर यांनी अत्यंत सोप्या, मुद्देसूद व प्रभावी भाषेत आचारसंहितेचे महत्त्व स्पष्ट केले. बौद्धांचे दैनंदिन जीवन आणि नैतिक मूल्यांचे पालन याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.त्यानंतर बौद्धाचार्य मधुकर सागरे गुरुजी यांनी बौद्धांच्या आचारसंहितेसोबतच "बौद्ध पूजा-पाठ आणि संस्कार विधी" या विषयावर सविस्तर प्रकाश टाकला. प्रत्येकाने आचारसंहितेचे काटेकोर पालन करून धम्माच्या सनमार्ग आणि धम्मपथावरून चालावे, असे आवाहन त्यांनी केले.प्रवचनाने प्रभावित होऊन उपस्थित उपासकांपैकी दिनेश कांबळे व ऋतिक कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. "आजच्या मार्गदर्शनातून आम्हाला खूप शिकायला मिळाले. आम्ही आजपासून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आचारसंहितेचे पालन करू," अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.सदर कार्यक्रमास किवळ आणि परिसरातील उपासक, उपासिका, लहान बालके आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल कांबळे व अर्जुन कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी अतिशय मंगलमय वातावरणात 'सरणतय' घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments