Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

प्रशासनातील पारदर्शकतेसाठी व लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी माहिती अधिकार कायदा सामान्य नागरिकांचे सुरक्षा कवच:- डॉ.सुभाष कांबळे

 प्रशासनातील पारदर्शकतेसाठी व लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी माहिती अधिकार कायदा सामान्य नागरिकांचे सुरक्षा कवच:- डॉ.सुभाष कांबळे

 

कराड - प्रतिनिधी.

  श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे समाजशास्त्र विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 28 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुभाष कांबळे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, प्रशासनातील पारदर्शकतेसाठी व लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी माहिती अधिकार कायदा सामान्य नागरिकांचे सुरक्षा कवच आहे. या कायद्याने खऱ्या अर्थाने नागरिकांना माहिती मिळण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 हा भारतीय संसदेने मंजूर केला. तेव्हापासून आत्तापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त नागरिकांनी माहिती अधिकाराखाली अर्ज केलेले आहेत. त्यामुळे लोकाभिमुख व सर्वाधिक वापरला जाणारा हा कायदा आहे. सर्व प्रकारच्या शासकीय संस्था व शासकीय संस्थेशी संबंधित सर्व विभाग, यांच्याकडे सर्वसामान्य नागरिक माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागू शकतो. ज्या ठिकाणी देशाचे सार्वभौमत्व, न्यायालयाचा अवमान व शासनाच्या गोपनीय बाबी येतात तेथे माहिती मिळत नाही. या बाबी सोडून सर्व प्रकारची माहिती प्रशासनाबाबत मागता येते. माहिती अधिकार कायद्याने देशातील राज्यातील अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणलेले आहेत. हे करत असताना आरटीआय कार्यकर्ते अडचणीत देखील आलेले आहेत प्रसंगी त्यांना प्राणाशी मुकावे लागले आहे. शासनाने आरटीआय कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी देखील कायदा केलेला आहे. लोकशाहीची जपणूक करण्यासाठी नागरिकांनी या कायद्याचा वापर योग्य पद्धतीने करावा.

                कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, या कायद्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांना लोकशाहीत महत्त्व प्राप्त झाले. आहे सामान्यातला सामान्य माणूस देखील शासनाकडे कोणत्याही कामाची माहिती सहजपणे साध्या अर्जाद्वारे मागू शकतो. संबंधित कार्यालयास ती माहिती देणे बंधनकारक असते. प्रशासनातील काही गोपनीय बाबी वगळता सर्व प्रकारची माहिती मिळू शकते. प्रशासनात पारदर्शकता येण्याच्या दृष्टिकोनातून या कायद्याचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी केला पाहिजे.

                कार्यक्रमासाठी सीनियर विभागातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दादासाहेब घाडगे यांनी केले. पाहुण्याचा परिचय राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी मिणचे यांनी केला. आभार प्रा. तेजस्विनी दळे यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा . रोहिणी कांबिरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. दिपाली वाघमारे, प्रा. ऋतुजा भाटले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments