आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचा नागरिकांशी संवाद.
कराड - प्रतिनिधी.
कराड दक्षिणचे आश्वासक आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांनी जनसंपर्क कार्यालय, मलकापूर येथे आयोजित जनता संवादात मतदारसंघातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी नागरिकांनी विविध समस्या, सूचना तसेच विकासकामांबाबत आपल्या अपेक्षा मांडल्या.नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक त्या कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. जनतेच्या समस्या वेळेत मार्गी लागाव्यात आणि नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल.जनतेशी थेट संवाद, पारदर्शक प्रशासन आणि विकासाला प्राधान्य देत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. नागरिकांचा विश्वास हीच माझी प्रेरणा असून, जनसेवेचा हा प्रवास अखंडपणे सुरू राहील असं आश्वासन यावेळी त्यांनी दिल.


Post a Comment
0 Comments