कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म.) घोगाव येथे औषध निर्माण दिन उत्साहात साजरा
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे जागतिक औषध निर्माण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.हा दिवस औषध निर्माणशास्त्र व औषध निर्माता यांचे महत्त्व तसेच त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच या दिनाचे औचित्य साधून नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन भारत यांच्या सहकार्याने कराड येथे साजरा करण्यात आला. यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना आरोग्यपूर्ण भविष्यासाठी औषध विक्रेत्यांना सक्षम करणे अशी होती. यावेळी विद्यार्थ्यांनी रॅली काढून पथनाट्य सादरीकरण केले. तसेच प्रतिजैविक प्रतिकारबाबत जनजागृती करण्यात आली. औषधांचा योग्य व सुरक्षित वापर आणि आरोग्य सेवेमध्ये फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कराड केमिस्ट्री अँड ड्रगेस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील हे उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments