जिल्हास्तरीय अभिवाचन स्पर्धेसाठी कौस्तुभ कृष्णा कांबळे यांची निवड.
शिराळा - प्रतिनिधी.
पंचायत समिती शिराळा अंतर्गत आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळा, पाचगणी येथील विद्यार्थी कौस्तुभ कृष्णा कांबळे याने अभिवाचन स्पर्धेत इयत्ता ६ वी ते ८ वी गटातून द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.कौस्तुभने आपल्या प्रभावी व ओघवत्या अभिवाचनातून परीक्षकांची मने जिंकली. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची जिल्हास्तरीय अभिवाचन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी कौस्तुभचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments