Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कासेगाव येथे गोकुळाष्टमीनिमित्त पारायण सोहळा संपन्न.

 

कासेगाव येथे गोकुळाष्टमीनिमित्त पारायण सोहळा संपन्न.

कासेगाव - प्रतिनिधी.

ज्ञानेश्वर सेवा मंडळ कासेगाव (ता.वाळवा.) यांच्या वतीने गोकुळाष्टमीनिमित्त पारायण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या पारायण सोहळ्याचा समारोप उद्योजक शंकर शिवाजी पाटील व सौ.सुप्रिया शंकर पाटील यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून करण्यात आला. सात दिवस चालू असलेल्या पारायण सोहळा मध्ये काकडा ज्ञानेश्वरी वाचन महिला मंडळ भजन हरिपाठ व कीर्तनाचे आयोजन केले होते. व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्त ह.भ. प दिलीप महाराज कासेगावकर यांनी काम पाहिले. यावेळी ह.भ.प बळीराम महाराज शिरसगावकर, अमोल महाराज विंगकर, उत्तम महाराज सुकनेकर, ज्ञानेश्वर माऊली महाराज आटकेकर, अनिल महाराज शेनोलीकर, युवराज महाराज उखळीकर व दिलीप महाराज कासेगावकर यांची कीर्तन सेवा आयोजित केली होती.यावेळी ज्ञानेश्वर वाचनासाठी 51वाचक आणि सहभाग घेतला गोकुळाष्टमी नंतर गोपाळकाला कीर्तन व दिंडीने या पारायण सोहळ्याची सांगता झाली. हा सोहळा यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर सेवा मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, रुक्मिणी व राजाई कुंभारवाडा भजनी मंडळ,सुतार वाडा भजनी मंडळ, वारकरी सेवा मंडळ, स्वामी समर्थ सेवा मंडळ, व गावातील सर्व वारकरी संप्रदायातील ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला होता. गेली 53 वर्ष हा पारायण सोहळा अखंडपणे सुरू आहे. या सोहळ्यासाठी युवा नेते मा. देवराज पाटील दादा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.





Post a Comment

0 Comments