ध्वजारोहणावेळीच आदर्श शिक्षक मनोहर कांबळे यांचे निधन.
शाहूवाडी - प्रतिनिधी.
स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा आनंदाचा क्षण सुरू असतानाच नेर्ले, ता. शाहूवाडी येथील मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक शाळा, कोकरूडचे कर्तव्यदक्ष, विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षक मनोहर शामराव कांबळे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. या दुर्दैवी घटनेने विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. या अनपेक्षित घटनेने उपस्थितांमध्ये मोठी खळबळ उडाली. उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.मनोहर कांबळे सर हे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. कर्तव्यनिष्ठा, विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी आणि आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अकस्मात निधनाने विद्यार्थ्यांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.“विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या एका आदर्श शिक्षकाला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच नियतीने हिरावून नेणे, ही अत्यंत वेदनादायी घटना आहे.” त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची आणि समाजाची मोठी हानी झाली आहे.स्व. मनोहर शामराव कांबळे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.


Post a Comment
0 Comments