उद्योजक दीपक सुगंधा तुकाराम कोकाटे यांना प्रतिष्ठित ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२६’ प्रदान
मुंबई: प्रतिनिधी.
जिद्द, अफाट मेहनत आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे मुंबईतील नामवंत उद्योजक दीपक तुकाराम कोकाटे यांना १५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रतिष्ठित ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, व्यवसाय आणि कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 'बांदिवडे' या छोट्याशा गावातून दीपक कोकाटे यांच्या स्वप्नाळू प्रवासाला सुरुवात झाली. ग्रामीण भागातून आलेल्या दीपक यांनी मुंबईसारख्या मायानगरीत इंटीरियर डिझाईनच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि आपल्या उत्कृष्ट कामाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी व स्वतंत्र ओळख निर्माण केली.व्यवसायात यशाचे शिखर गाठत असतानाच त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी ढळू दिली नाही. माणसे जोडणे, सामाजिक उपक्रमांना पाठबळ देणे आणि माणुसकी जपणे हा त्यांचा स्वभाव राहिला आहे. कला आणि संस्कृती जपण्यातही त्यांचा नेहमीच मोलाचा सहभाग असतो.त्यांच्या या यशाबद्दल आणि पुरस्कारप्राप्तीबद्दल त्यांचे व्यावसायिक सहकारी, मित्रपरिवार, नातेवाईक आणि भजनी मंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कष्ट, संघर्ष आणि स्वप्नांना योग्य दिशा देणारे एक यशस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून दीपक कोकाटे यांच्याकडे पाहिले जाते.



Post a Comment
0 Comments