Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कोडोली प्रशालेत पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न.

 कोडोली प्रशालेत पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न.

कार्वे - प्रतिनिधी.

   भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली  प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संभाजी पाटील नाना होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. कांबळे के.टी सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी पालकसभेचे उद्दिष्ट, पालकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शाळा व पालक यांची  महत्वपूर्ण भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.यानंतर सौ. जगताप एल. एम मॅडम यांनी  पालक व विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद, परस्पर विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांच्या भूमिकेचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे विशद केले. बदलत्या व तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्ये आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची सांगड घालत स्वतःला सक्षम बनविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच पालकांनीही काळानुरूप बदल स्वीकारून मुलांना योग्य दिशा, प्रोत्साहन आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी प्रशालीचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. आंबी एस. ए. यांनी  शाळेची शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांची उपस्थिती, गुणवत्ता विकास, शिस्त, विविध उपक्रम तसेच आगामी शैक्षणिक नियोजन याविषयी सविस्तर माहिती देत पालकांना विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.सभेदरम्यान पालकांनी विविध सूचना व अपेक्षा व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेसोबत सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही देत पालकांनी विद्यालयाच्या उपक्रमांचे मनापासून कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले. उपस्थित सर्व पालकांचे आभार मानून पालकसभेची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments