डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डी. वाय. पाटील) यांचे निधन.
ब्युरो रिपोर्ट ( Shakur Mulla ) :-
डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डी. वाय. पाटील) हे एक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल होते. त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला व ४ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक होते.शैक्षणिक आणि सामाजिक कार्यसंस्थांची स्थापना: देशभरात १८२ हून अधिक शैक्षणिक संस्था आणि अनेक डीम युनिव्हर्सिटीची स्थापना केली.पद्मश्री पुरस्कार: समाजकार्यातील योगदानासाठी भारत सरकारतर्फे १९९१ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित.आरोग्य व क्रीडा: शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि क्रीडा क्षेत्रात मोठी मोलाची कामगिरी केली.राजकीय कारकीर्दआमदार व महापौर: १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूरचे महापौर आणि १९६७ व १९७२ मध्ये पन्हाळ्याचे आमदार म्हणून कार्य.राज्यपाल पदे: त्रिपुरा (२००९-२०१३), तसेच बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली


Post a Comment
0 Comments