साळशिरंबे येथे जीवनदीप फाऊंडेशन संचलित सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेचे उद्घाटन.
उंडाळे - प्रतिनिधी.
साळशिरंबे, ता. कराड येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दि. 15 ऑगस्ट 2026, शनिवार रोजी साळशिरंबे गावात "जीवनदीप फाऊंडेशन संचलित सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका" चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या वाचनालयाचे उद्घाटन साळशिरंबे गावच्या नवनियुक्त ग्रामसेविका सन्मानीय पल्लवी गुरव मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी साळशिरंबे गावच्या माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासक , मा.उपसरपंच, मा.ग्रामपंचायत सदस्य, तसेच वि.का.स. सोसायटी साळशिरंबेचे सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.श्री. संपत पांडुरंग शेंडगे, श्री. विकास जगन्नाथ कुंभार, श्री. विकास महादेव शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनदीप फाऊंडेशनचे पदाधिकारी: अध्यक्ष मा. श्री. शकूर मुल्ला, उपाध्यक्ष श्री. राहुल देशमुख, सचिव संदेश थोरात, खजिनदार श्री.महेश पाटील,श्री. अजिंक्य पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं.कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी जीवनदीप फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या वाचनालयामुळे गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी व अभ्यासासाठी चांगले व्यासपीठ मिळेल आणि गावात वाचन संस्कृती वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी शांत अभ्यासाची जागा, विविध विषयांची पुस्तके आणि वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार आयोजकांच्या वतीने मानण्यात आले.


Post a Comment
0 Comments