Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कोडोली प्रशालेत भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.

 कोडोली प्रशालेत भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.
    

कार्वे - प्रतिनिधी.

भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली प्रशालेत  भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहा साजरा झाला. प्रशालेचे प्र .मुख्याध्यापक श्री.आंबी एस. ए सर  यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. प्रशालेतील निवडक विद्यार्थिनींनी राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत सादर केले.  इ.8वी ते  इ.10वी च्या विद्यार्थ्यांनी लेझीम चे सादरीकरण केले. तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी संगीत कवायत प्रकाराचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रशिक्षक  सौ. जगताप मॅडम  यांनी झांज पथक व कवायत प्रकारासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.आंबी सर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.  स्वातंत्र्यदिनानिमित्त कोडोली गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कोडोली या ठिकाणी निवडक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली. तसेच देशभक्तीवर आधारित समूहगीते सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री.कांबळे के.टी सर यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संभाजी पाटील नाना सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व  ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments