Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे लैंगिक छळ प्रतिबंधाबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे लैंगिक छळ प्रतिबंधाबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन.

              घोगाव :- मार्गदर्शन करताना दीपा पाटील समवेत प्राचार्या डॉ. वैशाली पाटील.

उंडाळे :- प्रतिनिधी.

श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे लैंगिक छळ व त्यावरील प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. निर्भया पथक कराडच्या पोलीस नाईक दीपा पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.यावेळी पोलीस नाईक दीपा पाटील यांनी लैंगिक छळाचे विविध प्रकार, त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजना, महिलांनी व विद्यार्थिनींनी घ्यावयाची काळजी तसेच प्रसंगी कायदेशीर मदत कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली. कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाला घाबरून न जाता त्याचा तत्काळ विरोध करावा आणि संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी असे आवाहन त्यांनी केले.तसेच विद्यार्थिनींनी आपल्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहावे, संशयास्पद किंवा त्रासदायक परिस्थितीत त्वरित पालक, शिक्षक किंवा पोलिसांची मदत घ्यावी. तसेच सोशल मीडिया व मोबाईलचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क ठेवताना आवश्यक असलेली सावधगिरी आणि संकटाच्या प्रसंगी पोलिसांची मदत कशी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.  वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुणा परीट यांनी मानले.



Post a Comment

0 Comments