राजमाता जिजाऊ बसेसचा उद्घाटन सोहळा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न.
कराड :- प्रतिनिधी.
कराड एस.टी. आगार येथे प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन राजमाता जिजाऊ बसेसचा उद्घाटन सोहळा कराड दक्षिणचे आश्वासक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रवाशांना प्रवासादरम्यान अधिक आरामदायी आणि सुरक्षित सुविधा मिळावी तसेच कराड व परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीचा व्हावा, या दृष्टीने ही नवी बससेवा सुरू करण्यात आली आहे.दैनंदिन प्रवासासाठी एस.टी. वर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य प्रवाशांच्या सोयीचा विचार करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या नवीन बसेस निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत.




Post a Comment
0 Comments