Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

तारळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश !

तारळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश !

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

तारळी प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्तांनी दिलेले सहकार्य आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देऊन ते तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट मंत्री शंभूराज देसाई यांनी निर्देश दिले आहेत.राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांची नावे जमिनीवर लावण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, तसेच पुनर्वसित गावांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, स्मशानभूमी यांसह आवश्यक मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.वेताळवाडी येथील पुनर्वसित गावठाणाची महसुली दप्तर तयार करून जमिनीची मोजणी करावी आणि शिल्लक जागेचा प्रश्न एका महिन्यात मार्गी लावावा, असेही प्रशासनाला निर्देश दिले आहेत.तारळी प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्येक बैठकीत त्यांना सहभागी करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जावे आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांवर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रकल्पग्रस्तांना न्याय आणि दिलासा मिळेपर्यंत त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा सुरूच राहील.

Post a Comment

0 Comments