भारत पाकिस्तान फाळणी म्हणजे ब्रिटिशांच्या फोडा व राज्य करा या धोरणाचे वेदनादायी स्मरण___डॉ.अभिजीत दळवी.
कराड - प्रतिनिधी.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे इतिहास विभाग इंग्रजी विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने "साहित्य आणि समाजावर पडलेला भारताच्या फाळणीचा प्रभाव" या विषयावरील परिसंवाद संपन्न झाला. परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अभिजीत दळवी होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, भारतात ब्रिटिशांनी 'फोडा व राज्य करा' हे धोरण राबवले. त्याचीच परिणीती भारताच्या फाळणीत झाली. भारत व पाकिस्तान दोन स्वतंत्र राष्ट्रे उदयास आली. एकसंघ भारताचे दोन तुकडे पडले. धार्मिक दंगली घडून आल्या. हिंदू मुस्लिम हिंसाचार घडून आला. लाखो लोक बेघर झाले. स्थलांतर करावे लागले. तर लाखो लोक हिंसाचारात मृत्युमुखी पडले. एकेकाळी एकत्र राहणारे हिंदू मुस्लिम शीख हे एकमेकाचे शत्रू बनले. लहान मुले महिला सर्वसामान्य माणसं या हिंसाचारस बळी पडली. याचा परिणाम भारतीय समाजावर व तत्कालीन साहित्यामध्ये आढळतो.
या परिसंवादाचे दुसरे साधन व्यक्ती प्रा. युवराज कापसे होते. ब्रिटिशांच्या द्वारे भारताची फाळणी कशी झाली. तत्कालीन काँग्रेस व मुस्लिम लीग यांना ब्रिटिशांनी एकमेका विरोधात उभे केले याची पार्श्वभूमी विविध उदाहरणासह सांगितली.
परिसंवादाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे यांनीही आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात भारत पाकिस्तान फाळणीच्या कटू आठवणी विशद केल्या. अत्यंत खडतर प्रसंगातून देश उभा राहिला. ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यलढा लढणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्यवीरास फाळणीच्या या भल्यामोठ्या समस्येलाही सामोरे जावे लागले.
या कार्यक्रमासाठी डॉ. सुभाष कांबळे, डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. रघुनाथ गवळी, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. सुरेश यादव, प्रा. प्रज्ञावंत कांबळे, प्रा. धनराज घुबडे प्रा. संभाजी पाटीलउपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजश्री मालेकर यांनी केले. आभार प्रा. अश्विनी खवळे यांनी व्यक्त केले. तर सूत्रसंचालन प्रा. शैला चौबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी श्री. वसंत कांबळे व पंकज कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments