मंत्री शंभूराज देसाई यांची सोळशी प्रकल्पाबाबत बैठक संपन्न.
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-
सोळशी प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मनातील शंका, अडचणी आणि पुनर्वसनाच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी ग्रामस्थ यांच्याशी बैठक आयोजित करून मार्गदर्शन केले . स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या सर्व अडचणी समजून घ्याव्यात व त्यांचे निराकरण करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून, संवरवाडी परिसरातील पुनर्वसनासाठी ग्रामस्थांच्या मागण्या विचारात घेऊन फेरसर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रांताधिकारी व तहसीलदारांनी या प्रक्रियेचा सातत्याने पाठपुरावा करावा.फेरसर्वेक्षण व पुनर्वसनाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण भिंत उभारण्याचे कामही प्राधान्याने करण्यात यावे.प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने, ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करावी. ग्रामस्थांचे हित, सुरक्षितता आणि त्यांच्या मागण्यांना सर्वोच्च प्राधान्य देत सोळशी प्रकल्पाची प्रक्रिया पुढे नेली जाईल.


Post a Comment
0 Comments