Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या वैचारिक व सामाजिक योगदानाचा मान्यवरांकडून गौरव

‘बहुजन चळवळ प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न.

 ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या वैचारिक व सामाजिक योगदानाचा मान्यवरांकडून गौरव

मुंबई - प्रतिनिधी.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे (BRSP) संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबई प्रदेश BRSPच्या वतीने ‘बहुजन चळवळ प्रेरणा दिन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन १० ऑगस्ट रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, दुसरा मजला, आझाद मैदान, मुंबई येथे करण्यात आले. कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. प्रमुख उपस्थितांमध्ये माजी आमदार बाबुराव माने तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक व मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांचा समावेश होता.यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या विद्यार्थी दशेपासूनच्या वैचारिक आणि सामाजिक प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. माने साहेबांसारख्या अभ्यासू, वैचारिक आणि सक्षम व्यक्तिमत्त्वाची लोकसभा अथवा राज्यसभेत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.


कार्यक्रमाचे उद्घाटक संदीप चव्हाण यांनी ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या वैचारिक व्यासंगाचे कौतुक करत त्यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाचा गौरव केला. त्यांनी माने साहेबांसोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. उपस्थित विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला.


या कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगार संघटना, म्युनिसिपल कामगार सेना, BRSP, BRVM, BAMCEF तसेच विविध सामाजिक व बहुजन संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष BRSPचे राष्ट्रीय महासचिव ॲड. दिनेश राजभर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पवार आणि डॉ. पंकज चाळके यांनी केले.‘बहुजन चळवळ प्रेरणा दिन’च्या माध्यमातून बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि वैचारिक प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या चळवळीला नव्या उर्जेची आणि प्रेरणेची दिशा देण्यात आली.कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या बहुजन साहित्य कला अकादमी, BRSP, BRVM, BAMCEF तसेच सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत, पत्रकार आणि सहकाऱ्यांचे मुंबई प्रदेश BRSP अध्यक्ष दिपक चौगुले यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.



Post a Comment

0 Comments