Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कराड येथे स्व. खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या कामाची आढावा बैठक संपन्न .

 कराड येथे स्व. खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या कामाची आढावा  बैठक संपन्न .

कराड - प्रतिनिधी.

 स्व. खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सर्किट हाऊस, कराड येथे बैठक कराड दक्षिणचे आश्वासक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत क्रीडा संकुलातील सुरू असलेल्या कामांचा, उपलब्ध क्रीडा सुविधांचा तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, क्रीडा संकुलाचा प्रभावी वापर सुनिश्चित करणे आणि उर्वरित कामांना गती देण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संबंधित कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.यासोबतच ‘हर घर तिरंगा’ अभियानाबाबत देखील आढावा बैठक पार पडली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी करण्यात येणारे नियोजन आणि नागरिकांचा सहभाग याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहोचवून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान, अभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments